Sujit Patkar: जम्बो केअर सेंटर घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सुजित पाटकर यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या जबाबाविषयी त्यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ईडीच्या कोठडीत असताना दबाव टाकून जबाब घेतल्याचा आरोप सुजित पाटकर यांनी केलाय. (Latest Crime News)
अधिक माहिती अशी की, "आपल्या अर्जातून त्यांनी जबाबाची नोंद न घेण्याचे आणि त्यांचा पुरावे म्हणून वापर न करण्याची न्यायालयाला विनंती केली आहे. ईडीच्या कोठडीत असताना जुलै 21 ते जुलै 26 दरम्यान अनेकवेळा पाटकर यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसच्या चार भागीदारांपैकी आपण एक भागीदार असताना केवळ आपल्यालाच अटक झाली. आपल्यावरील अटकेची कारवाई राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा पाठकरांनी केला आहे. सुजित पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत. 19 जुलैला त्यांना जम्बो केअर सेंटर घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
कोविड काळातील कमाईचा हिशोब द्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो केअर सेंटर घोटाळ्याविरोधात आवाज उठवला होता. सोमय्या यांनी ट्विट करत संजय राऊत यांचे पाटनर सुजित पाटकर यांनी कोवीडमध्ये किती कमाई केली त्याचा जवाब द्या, असं म्हटलं होतं. बोगस बिलांविरुद्ध 2.32 कोटी भरले. ते पैसे कुठे गेले? लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने बेनामी खात्यात 14 कोटी हस्तांतरित केले त्याचे पैसे कुठे गेले? असा सवाल सोमय्या ट्विट करत केला होता.
१०० कोटींच्या कॉन्ट्रॅक्टसाठी ६००० वैद्यकीय आणि अर्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती, त्यावेळेला लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडे त्यांच्या पॅरोलवर फक्त १८ कर्मचारी होते. १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देताना ही कंपनी अस्तित्वातच नव्हती, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.