Breaking : TET परीक्षेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
Breaking : TET परीक्षेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking : TET परीक्षेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये झालेल्या गंभीर अनियमिताबाबत सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिवांची (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे ही समिती गठीत केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.

दरम्यान समितीमध्ये आयुक्त (शिक्षण) पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे, संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई हे सदस्य असतील. तर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

ही समिती सन 2019-2020 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये TET तसेच जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल 7 दिवसांमध्ये व सविस्तर चौकशी अहवाल 15 दिवसांत शालेय शिक्षण मंत्र्यांना सादर करणार आहे.

हे देखील पहा -

दरम्यान राज्यात झालेल्या आरोग्य भरती, MHADA आणि TET च्या परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम यांच्या घरी पुणे पोलिसांनी दुसरा छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी दीड कोटी रुपयांची रोकड आणि दीड किलोचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

SCROLL FOR NEXT