Uddhav Thackeray Emotional  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : पक्षचिन्ह गेलं उद्धव ठाकरे रडले; भास्कर जाधव यांच्या भाषणानं सभागृह स्तब्ध!

ठाकरेंना याआधी इतकं भावूक झाल्याचं कधी पाहिलं नाही, असं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर घडलेला भावनिक प्रसंग सांगितला.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray Emotional : इतक्या वर्षामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अनेक संकटं आली पण ते कधीही डगमगले नाही. मात्र, धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने (Shivsena) उद्धव ठाकरे खूप भावूक झाले होते. ठाकरेंना याआधी इतकं भावूक झाल्याचं कधी पाहिलं नाही, असं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर घडलेला भावनिक प्रसंग सांगितला. (Shivsena News Today)

ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. या सभेत ते बोलत होते. भास्कर जाधवांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून संपूर्ण सभागृहदेखील सुन्न पडल्यासारखे झाल्याचे दिसून आले.

निवडणूक आयोगाने शिवसेना नावासह पक्षचिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चिन्ह आणि पक्षाच्या नावावर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलवली होती. यावेळी आमदार आणि खासदारांच्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं. (Maharashtra News)

काय म्हणाले भास्कर जाधव?

आम्ही (शिवसेना नेते-उपनेते) उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटायला गेलो होतो. त्यावेळीही मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं. ते दाखवत होते की मला काहीही झालं नाही, मी ठीक आहे, पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी ते लपवू शकले नाहीत. मी त्यांना विचारलं, साहेब तुम्हाला काय झालंय, तुम्ही कितीही लपवा, पण डोळ्यातलं पाणी लपवू शकत नाही'.

'इतक्या वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक संकटं आली पण ते कधीही डगमगले नाही. मात्र, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवल्याचं कळताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बाळासाहेब ज्यावेळी देवाची पूजा करायचे त्यावेळी ते धनुष्यबाणालाही पुजायचे. आज ते धनुष्यबाण गोठवलंय, असं सांगत असताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते, असा हेलावून टाकणारा प्रसंग सांगून भास्कर जाधवांनी शिवसैनिकांना रडवलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

पालघरमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट, शाळा गाठण्यासाठी मृत्यूच्या ट्रॅकवरुन प्रवास

Face Care: फेस हेअरसाठी तुम्हीपण रेजर वापरताय? चेहऱ्यावर रेजर वापरण्यापूर्वी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT