Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSaamTv News

Eknath Shinde : शिंदे गटासमोर 'या' ४ चिन्हांचा पर्याय, उद्या अधिकृत भूमिका मांडणार

नवीन चिन्हांबाबत शिंदे गटाची वर्षा बंगल्यावरील महत्वाची बैठक झाली.
Published on

Eknath Shinde News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठावल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाचे मूळ नाव 'शिवसेना' आणि चिन्ह देखील वापरता येणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांना नवीन पर्याय निवडावे लागणार आहे. या चिन्हांबाबत शिंदे गटाची वर्षा बंगल्यावरील महत्वाची बैठक झाली.

Eknath Shinde Latest News
Thackeray Vs Shinde : शिंदे-ठाकरे गटात पुन्हा वादाची शक्यता; आणखी एक नाव गोठवलं जाणार?

शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नव्या चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यासाठी वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. शिंदे गटाकडून उगवता सूर्य, तुतारी, तलवार, गदा या चिन्हांचा शिंदे गटाकडून पर्याय निवडण्याची शक्यता आहे. वर्षा बंगल्यावरील बैठकीत या चिन्हांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत पक्षाचे नाव, चिन्ह निवडण्याचे सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदे यांना बैठकीत देण्यात आले. उद्या, सोमवारी १ वाजता शिंदे गटाकडून अधिकृत भूमिका मांडली जाणार आहे. निवडणूक आयोगाकडे देण्यात येणारे पक्षाचे नाव, चिन्ह याबाबत सोमवारी भूमिका शिंदे गट मांडणार आहे, त्यामुळे साऱ्यांचे लक्ष त्यांच्यावर अस णार आहे.

Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या फेसबूक लाईव्हमधील ठळक मुद्दे

ठाकरे गटाकडून तीन नावे आणि तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटानेे 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे दिली. तसेच तीन चिन्हेही निवडणूक आयोगाकडे दिली आहेत. यामध्ये त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य ही तीन नावे दिली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com