10 Lakh Cash Seized in Nalasopara Saam Tv
मुंबई/पुणे

Election 2026: नालासोपाऱ्यात १० लाखांची रोकड पकडली, भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप; VIDEO समोर

10 Lakh Cash Seized in Nalasopara: महापालिका निवडणुकीदरम्यान नालासोपाऱ्यात १० लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. हे पैसे घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. भाजपकडून हे पैसे वाटण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप केला जात आहे.

Priya More

Summary -

  • नालासोपाऱ्यात १० लाखांहून अधिक रोकड जप्त

  • मध्यरात्री अडीच वाजता पोलिसांची मोठी कारवाई

  • भाजपकडून मतदारांना पैसे वाटपाचा आरोप

  • या प्रकरणी दोन दुचाकीसह दोघांना अटक केली

महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नालासोपाऱ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी तब्बल १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुकाकीच्या डिक्कीमधून दोघे जण हे पैसे घेऊन जात होते. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी नेताना नालासोपाऱ्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली. १० लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. दोघे जण पैशांची वेगवेगळे पॉकिटे, एका प्लॅस्टिक पिशवीत टाकून दुचाकीच्या डिक्कीतून घेऊन जात होते. या दोघांना पोलिसांनी पेल्हार ब्रिजजवळ मध्यरात्री अडीच वाजता पकडले. त्यांची तपासणी केली असता तब्बल १० लाखांची रोख रक्कम त्यांच्याकडे सापडली.

भाजपकडून हे पैसे मतदारांना वाटप करण्यासाठी नेण्यात येत होते असा आरोप करण्यात आला आहे. १० लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम दोन दुचाकीमधून घेऊन जात होते. याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात दोघांविरोधात कलम बीएमएस १७३ अंतर्गत मतदारांना लाच दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पेल्हार पोलिसांनी दोघांनाही अटक केली. या घटनेमुळे नालासोपाऱ्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे गेल्या २० दिवसांत निवडणूक गस्त घालण्याच्या मोहिमेदरम्यान महापालिकेने आतापर्यंत ३.१ कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली. तर ४४ कोटी रुपये किंमतीचे ५५ किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ८.३ लाख रुपये किंमतीची १२३७ लिटर दारू जप्त केली आहे. महापालिकेने निवडणुकीशी संबंधित एकूण १६ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. तर १३ दखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. मुंबई महानगर पालिकेने सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेत रस्त्याच्या वादातून दोघांना कुऱ्हाड आणि खोऱ्याच्या दांड्याने मारहाण

Saree Designs: पैठणी की खण साडी? हळदी-कुंकू समारंभासाठी कोणता लूक तुमच्यावर उठून दिसेल? पाहा हे 5 लेटेस्ट साडी पॅटर्न

Shiv Thakare Wedding: लग्नाला मज्जा आली...; लग्न नाही म्यूझिक व्हिडिओ, शिव ठाकरेच्या गुपचुप केलेल्या लग्नाचं गुपित कळलं

Nandurbar : शिंदेसेनेच्या नेत्यावर दरोडा आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, भाजप नेत्याचा गंभीर आरोप, नंदुरबारचे राजकारण तापलं

Navi Mumbai: मतदानाच्या २ दिवस आधी भाजपकडून मोठी कारवाई, ११ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT