नालासोपारातील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान पोलिसांचा पोलीस ठाण्यात देखील धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नालासोपारा मधील तुळींज पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटात मंगळवारी फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही हाणामारी चक्क पोलसांसमोरच झाली. या दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाला बाजूला केले.जर पोलीस ठाण्यातच असे दोन गट आपापसात भिडत असतील तर पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र हे भांडण का? व कोण? करत होते याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.
नालासोपाऱ्यात हाणामारीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. नालासोपारा येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास वडील आणि मुलाने दोन वाहतूक पोलिसांवर क्रूर हल्ला केला. वाहतूक कर्मचाऱ्यांनी पार्थ नारकरला परवाना नसताना गाडी चालवल्याबद्दल थांबवले. त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना घटनास्थळी बोलावले आणि दोघांनी मिळून अधिकाऱ्यांवर हल्ला केला.
दोघांनी अधिकाऱ्यांना जमिनीवर ढकलले आणि वारंवार लाथा मारल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुन्हा एकदा जनतेच्या रक्षणासाठी २४तास तत्पर असलेल्या पोलिसांच्या धाकावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.