Mumbai Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video : दुसरा जन्मच मिळाला! बस अंगावरून गेली तरीही वृद्ध बचावला, पाहा CCTV

Shivani Tichkule

मुंबई - देव तारी त्याला कोण मारी अशी मराठीत म्हण आहे. याचाच प्रत्यय मुंबईतून आला आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) पवई भागातील असून जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुंबईतील पवई परिसरात एका वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडत असताना प्रथम बसच्या पुढील भागावर आदळला आणि नंतर बसखाली आली. नंतर खाली कोसळलेल्या त्या वृद्धावरून संपूर्ण बस गेली. मात्र, हा पादचारी सुखरूप बचावला. (Mumbai Viral Video)

एवढेच नव्हे तर नंतर स्वत: उठून तो वृद्ध पादचारी पुन्हा व्यस्थित चालत आपल्या मार्गे निघून गेला. वृद्ध पादचाऱ्याला थोडेसे खरचटले असले तरी गंभीर जखम झाली नाही. मात्र, या अपघाताचा व्हिडिओ पाहून बघणाऱ्यांचा ठोका मात्र चुकला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

पवईतील लेकसाईड कॉम्प्लेक्स येथे मंगळवारी हा अपघात झाला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर रहदारी असल्याने सुदैवाने बसचा वेग कमी होता. उपस्थित लोकांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बस ड्रायव्हरही दार उघडतो आणि बघू लागतो.

बसखाली गेलेल्या त्या वृद्ध पादचाऱ्याचे काय झाले असेल, अशी धाकधूक आजुबाजूच्या नागरिकांमध्ये दिसते. इतक्यात एक वृद्ध बसच्या मागून बाहेर येतो आणि ओरडत ओरडत ड्रायव्हरच्या दिशेने येतो. त्यामुळे सर्वजण सुटकेचा नि:श्वास सोडतात. अवघ्या काही सेंकदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cylinder Blast : सिलेंडरचा स्फोट, अख्खं घर कोसळले; पती-पत्‍नीसह ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

Maharashtra Politics: नगरचं राजकारण तापलं! काल जयश्री थोरातांनी झापले, आज सुजय विखेंनी पुन्हा डिवचले!

Silver Rate Today : चांदीचा भाव १ लाखांच्या पुढे; गगनाला भिडलेले तुमच्या शहरातील दर वाचले का?

Nandurbar News : भरत गावित यांना राष्ट्रवादीची उमेदवारी; नाराज कार्यकर्त्यांकडून पक्षाचा सामूहिक राजीनामा

Prithvi Shaw: वाढतं वजन अन् उद्धटपणा नडला? टीम इंडियानंतर मुंबई संघातूनही पृथ्वी शॉची सुट्टी

SCROLL FOR NEXT