Supreme Court , Shirdi , Sai Sansthan SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात फैसला

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे, साम टिव्ही

Maharashtra Political News : मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Election) आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. या निवडणूका महाविकास आघाडीने (Maharashtra Politics) घेतलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार होणार यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमुर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे.

तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने २०२१ ला कोरोनामुळे जनगणना न झाल्याने गेल्या जनगणेनेच्या आधारावर मुंबई महापालिकेची सदस्य संख्या २२७ वरून २३६ केली होती. २०१२ आणि २०१७ च्या महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये सदस्य संख्येत कोणताही बदल न करता पार पडल्या होत्या म्हणून ठाकरे सरकारने २०११ च्या जनगणनुसार सदस्य संख्येत बदल केला होता.

दुसरीकडे राज्यात नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी कायदा करत पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्या २३६ वरून २२७ केली होती. तर राज्यातील २३ महानगरपालिका आणि २०७ नगरपालिका, २५ जिल्हा परिषद, २८४ १३ पंचायत समितीच्या सदस्यसंख्येत बदल करताना ठाकरे सरकारने कोरोनामुळे जनसंख्या उपलब्ध नसल्याने लोकसंख्येतील सरासरी १० टक्के वाढ लक्षात घेता सदस्य संख्येत वाढ केली होती.

दरम्यान, नवीन सरकारने मागील ठाकरे सरकारने लोकसंख्या वाढ गृहीत धरून केलेले बदल गृहीत न धरता नव्याने राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने पुर्वी जी प्रभाग रचना होती. ती स्थिती जैसे थे केली होती. नवीन सरकारने केलेल्या या बदलाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर १३ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग रचनेसंदर्भात आणि कोर्ट नंबर ०९ मध्ये राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येसंदर्भात सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT