Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मोदींच्या सभेतील CM शिंदेंच्या भाषणानंतर ठाकरे गट टाकणार डाव, EC समोरील सुनावणीआधीच...

निवडणूक आयोगासमोरील सुनावणीआधी ठाकरे गटाने एक मोठी खेळी खेळली आहे.

Shivaji Kale

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची सुनावणी आज निवडणूक आयोगासमोर होणार आहे. दुपारी ४ वाजता या सुनावणीला सुरूवात होणार असून निवडणूक आयोग कुणाच्या बाजूने निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, निवडणूक आयोगासमोरील सुनावणीआधी ठाकरे गटाने एक मोठी खेळी खेळली आहे.  (Latest Marathi News)

ठाकरे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde)  यांच्या वक्तव्याचा दाखल निवडणूक आयोगासमोर ठेवणार असल्याची माहिती आहे. गुरूवारी (19 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले असताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात आम्ही मोदींचेच असल्याचं परदेशात सांगितल्याचं मान्य केलं होतं.

याच वक्तव्याचा दाखला आता ठाकरे गट निवडणूक आयोगासमोर मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधीच एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे अवैध्य असल्याचा दावा ठाकरे गट करीत आहे. त्यामुळे शिंदेंचा हे विधान त्यांच्याच अंगलट येईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Political News)

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

बीकेसी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाओस दौऱ्याविषयी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, दाओसला प्रत्येकजण मोदींबद्दल विचारत होते. दुसऱ्या देशाचे मंत्री आपण मोदींचे भक्त असल्याचे सांगत होते. ‘आपण’ मोदींना मानता का? असे विचारले असता, मी सांगितले की आम्ही मोदींचीच माणसे आहोत’. मोदींच्याच मार्गदर्शनाखाली आम्हाला मुंबई- महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, असं शिंदेंनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Maharashtra Live News Update: मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

SCROLL FOR NEXT