Video : शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगाच्या सुनावणी आधीच उल्हास बापट यांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...

निवडणूक आयोगाची सुनावणी होण्याआधीच घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ulhas Bapat
Ulhas Bapatsaam tv

Shivsena News : शिवसेना आणि शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगात आज म्हणजेच 20 जानेवारीला निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीत अंतिम निकाल ठाकरे गट की शिंदे गटाच्या बाजूने लागेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी होण्याआधीच घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Ulhas Bapat
Shivsena News: शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी, आजच निकाल येण्याची शक्यता

घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) म्हणाले, 'सुप्रीम कोर्टात पक्षांतर बंदी कायद्याच्या अर्थ लावण्याचे काम सुरू आहे. १६ आमदार अपात्र झाले का नाही, हे ठरवयाचं आहे. निवडणूक आयोगाचं काम एखाद्या पक्षाला मान्यता देणे, चिन्ह देणे असतं. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की, अंतिम निर्णय लागत नाही'.

'तोपर्यंत निर्णय देऊ नका. आता घटनापीठ झालं की, त्यात सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवडणूक आयोगला सांगितले की, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, ते तुमचं काम आहे. संविधानाने तुम्हाला अधिकार दिला आहे. त्यांनी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबावं, असं मला व्यक्तिगत वाटतं, असेही बापट पुढे म्हणाले.

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला कोणते पर्याय आहे, याबाबत उल्हास बापट म्हणाले, ' मला व्यक्तिगत असं वाटतं की, निवडणूक आयोगाने परिपक्वता दाखवली की, आता चिन्ह जसं गोठावलं आहे. तसंच चिन्ह गोठवावं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांचा निर्णय द्यावा. असं माझं मत आहे. राजकारण मी जात नाही'.

आज काय होणार?

>> ठाकरे गट शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रावर आक्षेप घेईल.

>> ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करतील.

>> अॅड मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानी कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढतील.

>> दोन्ही बाजूचा युक्तीवाद उद्याच जर पूर्ण झाला तर रात्री उशिरा निवडणूक आयोग आपला निर्णय देइल.

>> अन्यथा सुनावणीची पुढील तारीख देईल.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

16 आमदार

13 विधानपरिषद

05 लोकसभा खासदार

03 राज्यसभा खासदार

182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य

प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)

प्राथमिक सदस्य 20 लाख

एकूण कागदपत्र 23 लाख 182

बाळासाहेबांची शिवसेना

खासदार 13

आमदार 40

संघटनात्मक प्रतिनिधी 711

स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी-2046

प्राथमिक सदस्य 4,48,318

शिवसेना राज्यप्रमुख 11

एकूण 4 लाख 51 हजार 139

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com