Mahavikas Aghadi News, Maharashtra Political Crisis News, MVA News
Mahavikas Aghadi News, Maharashtra Political Crisis News, MVA News Saam Tv
मुंबई/पुणे

महाविकास आघाडीला घटक पक्षाकडून आजही बसणार झटका?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजप आणि शिंदे गट एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने पहिली परीक्षा जिंकली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली. तर आज शिंदे-फडणवीस सरकारला आज बहुमत चाचणी होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस या सरकारसाठी महत्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, काल विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे काही सदस्य गैरहजर होते. त्यामुळे महाविकास आघाडीची काल संख्या कमी झाली. आता आज शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आजही गैरहज राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आजच्या विश्वासदर्शक ठरावात एमआयएम आणि समाजवादी पार्टी तटस्थ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला घटक पक्षाकडून आजही झटका मिळणार? का आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विश्वासदर्शक ठरावात आजही महाविकास आघाडीचे सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर काल महाविकास आघाडीचे काही सदस्य गैरहजर होते. एकनाथ शिंदे गटाला मान्यता मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून आक्षेप नोंदविला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना (Shivsena) गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे. ( shivsena Political Crisis News In Marathi)

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे शिंदेवर मोठी कारवाई केली होती. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT