Sharmila Pimpalolkar-Gaikwad set to take charge as Mayor of Thane Municipal Corporation. Saam Tv
मुंबई/पुणे

ठरलं! शिंदेसेनेकडे सव्वा वर्ष महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद, ही महिला नेता संभाळणार महापालिकेची धुरा

Shinde Sena Mayor Formula In Thane Municipal Corporation: ठाणे महापालिकेत अखेर सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिंदेसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद राहणार असून शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड या ठाण्याच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत.

Omkar Sonawane

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये अखेर महापौरपद शिंदेनी कायम ठेवले आहे. तर दोनवर्षासाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत करत उपमहापौर पदी अर्ज दाखल केला आहे. शिंदेसेनेच्या महापौरपदी कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देश पत्र दाखल केले आहे.

भाजपकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देश दाखल केले आहे. विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येणाऱ्या 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

महापौरपदासाठी शिंदेगटाकडून 7 नगरसेवकांची नावे समोर आली होती. यामध्ये दर्शना जानकर, आरती गायकवाड, वनिता घोगरे, दीपक जाधव,गणेश कांबळे, पद्मा भगत, आणि विमल भोईर यांची नावे आघाडीवर होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी कोपरी येथून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या शर्मिला पिंपोळोलकर-गायकवाड यांच्यावर विश्वास टाकत महापौरपदाची संधी दिली आहे.

दुसरीकडे महापौरपदासाठी आग्रही असणाऱ्या भाजपने उपमहापौर पदावर समाधान मानले आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देश पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड निश्चित झाली आहे. येणाऱ्या 3 फेब्रुवारीला शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

सव्वा वर्षासाठी असणार महापौर आणि उपमहापौरपद

महापौर आणि उपमहापौरपदाचा फॉर्म्युला पहिले सव्वा वर्षे महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षाने शिंदेसेनेचा महापौर बसणार आहे. तसेच भाजपकडून देखील उपमहापौर पद डे सव्वा वर्षासाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा सव्वा वर्षाने उपमहापौरपदाचा चेहरा देखील बदलला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wight Loss Drink: वजन कमी करायचयं पण गोड खाण्याची इच्छा होते? मग ट्राय करा हे खास डाईट ड्रिंक

Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदीची सुवर्णसंधी, सोन्यात १०००० तर चांदीत ३०००० रुपयांची घसरण

Family Trip : कुटुंबासोबत लाँग ट्रिपचा प्लॅन करत आहात? मग या सुंदर ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेसाठी भाजपकडून गटनेता पदावर शिक्कामोर्तब

Mosquitoes bite: डास रात्रीच्या अंधारातच का माणसांना चावतात?

SCROLL FOR NEXT