Vaishnavi Kirad, Pune Kasba Politics Saam TV Marathi
मुंबई/पुणे

पुण्यात एकनाथ शिंदेंना चंद्रकांत पाटलांचा जोरदार धक्का, बड्या महिला नेत्यानं कार्यकर्त्यासोबत सोडली साथ

Chandrakant Patil vs Eknath Shinde : पुण्यातील कसबा मतदारसंघात भाजपचे ‘मिशन कसबा’ जोरात सुरू झाले आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी वैष्णवी किराड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Vaishnavi Kirad, Pune Kasba Politics : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून शिवसेना (शिंदे गट) नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा झटका दिला आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या कसबा मतदारसंघात भाजपचे 'मिशन कसबा' सुरू झालेय. कसबा मतदार संघातील शिवसेनेतील पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

प्रतिभा धंगेकर यांच्याबरोबर निवडणूक लढवलेली वैष्णवी किराड चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

कसब्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी वैष्णवी किराड या आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही शेकडो पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वैष्णवी किराड यांनी यापूर्वी शिवसेनेकडून महानगरपालिका निवडणूक लढवली होती. त्या किराड समाजातील एक प्रतिष्ठित चेहरा असून कसबा भागात त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाला जोरदार धक्का मानला जातोय.

रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावर विविध आरोप केले होते. यानंतर समीर पाटील यांनी पुराव्यांशिवाय आरोप करू नये, यासाठी कोर्टाकडून स्टे-ऑर्डर आणली होती. धंगेकरांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप आणि स्मिता पाटील यांनी कसब्यात 'मिशन कसबा' हाती घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी हा धंगेकर आणि शिवसेनाला जोरदार धक्का मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT