Municipal Corporation Election Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Municipal Corporation Election : महापालिका निवडणुका कधी होणार? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने थेट तारखा सांगितल्या

KDMC Election Date Announce : कल्याणमध्ये झालेल्या शिंदे सेनेच्या मेळाव्यात शहरप्रमुख रवी पाटील यांनी केडीएमसी निवडणुकीची तारीख १५ जानेवारी असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाच्या आधीच घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

कल्याणमध्ये झालेल्या मेळाव्यात शिंदे सेनेचा मोठा दावा

रवी पाटील यांनी केडीएमसी निवडणुकीची तारीख जाहीर केली

निवडणूक आयोगाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही

या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचं बिगुल वाजलं आहे, तर दुसरीकडे शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. आगामी निवडणुकांसाठी कल्याण मध्ये झालेल्या मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

देशभरात मत चोरीचा आरोप करत विरोधक सत्ताधारी पक्षांवर आक्रमक होताना दिसत आहे. राहुल गांधीपासून राज ठाकरे या सारख्या बड्या नेत्यांनी निवडणूक आयोग व सत्ताधारी यांच्यावर मत चोरीचा आरोप लावत मोठे आंदोलन उभे केले आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी व मनसे व इतर छोट्या पक्षांनी मतचोरी विरोधात मुंबईत मोठा मोर्चा सुद्धा काढला होता.

अशातच आता कल्याणच्या शिंदे सेनेच्या शहर प्रमुखांच्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. शहर प्रमूख रवी पाटील यांनी कल्याण मध्ये झालेल्या मेळाव्यात आगामी निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. निवडणूक आयोग कोणतीही घोषणा करण्यापूर्वी पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे चर्चांना उधाण आले आहे. त्याच बरोबर नागरिकांसह राजकीय गोटात अनेकांच्या भुवया ऊचलल्या आहेत.

आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (शिंदे गट) तर्फे काल नारी शक्ती मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान शहर प्रमुख रवी पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

पाटील काय म्हणाले?

पाटील म्हणाले, १५ जानेवारीला केडीएमसीची निवडणूक होणार असून १३ डिसेंबरच्या आत आचारसंहिता लागू होईल असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला. निवडणूक आयोगाच्या आधी त्यांनी तारखा जाहीर केल्याने या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याच बरोबर पाटील यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला राळेगण सिद्ध येथे दाखल..

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT