Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेमचेंजर खेळी खेळली आहे. पालघरमधील बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

रुपेश पाटील

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डहाणूतील राजू माच्छी आणि ६ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची राजकीय घडामोड

भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का

शिवसेना शिंदे गट डहाणूत स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासाठी जोरदार तयारी केली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी नगरपरिषद आणि जिल्हा परिषदासाठी नेत्यांच्या गाठीभेटी आणि बैठकांचा सपाटा लावला आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र चर्चा करत असताना एकनाथ शिंदे यांनी गेमचेंजर खेळी खेळली आहे. एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील बड्या नेत्यांना गळाला लावलं आहे.

शिंदे गटाने पालघरच्या डहाणू विधानसभेत मोठा डाव टाकत नगरपरिषद हद्दीतील बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावलं आहे. डहाणू नगरपरिषद हद्दीतील बड्या नेत्यांपैकी एक असलेल्या डहाणू नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

राजू माच्छी यांच्यासह डहाणू नगरपरिषदमधील सहा माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने मित्र पक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.

राजू माच्छी आणि त्यांच्यासोबत पक्षातील पदाधिकाऱ्यांमुळे डहाणू नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट स्वबळाची तयारी करत असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

शिरूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांच्यासह रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी शेखर पाचुंदकर यांनी नाव न घेता दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchank Yog 2025: दिवाळीपूर्वीच पंचक योग 3 राशींना करणार मालामाल; गुरु-शुक्र मिळवून देणार पैसाच पैसा

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

Maharashtra politics : अजित पवारांचा शिंदेंना धक्का, नवी मुंबईतील अनेकांच्या हातात घड्याळ

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT