Eknath Shinde News, Pune Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे गटाची ही असेल पुढील महारणनीती; गुवाहाटीतून मुक्काम हलवणार

मुंबईत लवकर पोहोचता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सुरज सावंत

मुंबई - शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून या सत्तासंघर्षात एंट्री केली आहे. फडणवीस (Devandra Fadnavis) यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली आहे. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण उद्याच मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्या राज्यपाल हे फ्लोअर टेस्टची मागणी करू शकतात.

शिंदे गटातील आमदार आज 3:30 च्या सुमारास गुवाहाटीहून गोव्याला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये 71 खोल्या बुक करण्यात आल्या असून त्या ठिकणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उद्या गोव्यातून आमदार थेट मुंबई राजभवनाकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. उद्या मुंबईत लवकर पोहोचता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पाहा -

देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे काल राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीची घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याच महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

February Grahan 2026: फेब्रुवारीमध्ये १५ दिवसात दोनवेळा लागणार ग्रहण; किती धोकादायक आहे ग्रहण? काय आहेत संकेत

Maharashtra Live News Update: आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल, वीजपुरवठा राहणार बंद

Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत; गॅस टँकर उलटल्याने झाला होता खोळंबा

SCROLL FOR NEXT