Eknath Shinde Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde: ५० जणांपैकी एकही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडेन: एकनाथ शिंदे

आज मुंबईत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संदिपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज मुंबईत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संदिपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सत्कार केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. आम्ही बंडखोरी केली तेव्हा अनेकांनी आमच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्या, आम्ही ५० आमदास निवडून येणार नसल्याचे ते म्हणाले, पण मी सांगतो या ५० आमदारांपैकी एकही आमदार पराभूत झालातर मी राजकारण सोडून देईन, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आता शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांच्या मतदार संघात एकही काम शिल्लक राहणार नाही हा विश्वास आहे. मी सुरू केलेले ऑपरेशन नेहमी पूर्ण होत असते. सुरुवातीला मी छोटे मोठे ऑपरेशन करायचो. हे मोठे ऑपरेशन होते. त्यामुळे मलाही काळजी होती. मी त्यावेळी झोपत नव्हतो. मला माझे टेन्शन नव्हते पण या ५० आमदारांच्या करिअरचे टेन्शन होते. तरही आम्हाला कामाखे देवीनेही आशीर्वाद दिले आहेत. कामाखे देवीकडे ५० बळी गेले म्हणत, बळी कोणाचा घेतला कामाखे देवीने ही सर्वांनी पाहिले आहे, असा टोलाही एखनाश शिंदे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

संभाजीनगरच्या नावाला स्थगिती नाही

जेव्हा सरकार अल्पमतात असते तेव्हा कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही. शेवटच्या कॅबिनेटमध्ये २०० निर्णय घेतले आहेत. हे निर्णय बेकायदेशीर आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. उद्या आम्ही कॅबिनेट घेऊन आम्ही हे निर्णय रद्द करणार आहे, कारण या निर्णयाला उद्या कोणी चॅलेंज करु शकतो. त्यामुळे हे निर्णय बेकायदेशीर ठरू शकले असते. आम्ही संभाजीनगर या नावाल स्टे दिलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघालेल्या शब्दाला आम्ही स्टे दिलेला नाही. तुम्ही कितीही खोट बोला ते पटणार नाही, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. शिवसेनेच्या नेत्यांचे आघाडीमध्ये खच्चीकरण झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT