प्राची कुलकर्णी
मुंबई: राज्यात शिवसेना (ShivSena) आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केले आहे, त्यामुळे आता राज्यातील सरकार अडचणीत आले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'मुंबई महापालिका निवडणुकांच्या अगोदर अस होणार याची आम्हाला कल्पना होती, अस पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)म्हणाले.
आमचा अंदाज असा होता की, मुंबई महापालिकाअगोदर अस काहीतरी होणार. शिवसेनेला संपवून मुंबई महापालिकेवर सरकार आणणे महत्वाचे आहे, यासाठी दिल्लीच्या सूचनेवर हे सगळं करण्यात आले आहे. कारण मुंबई महापालिका सर्वात मोठी महापालिका आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) दिल्लीवरुन आदेश घेऊन येत होते.
या अंदाजामुळे आम्ही सावध होतो, पण त्यांनी मोठा खेळ केला. ईडीचा (ED) वापर करुन आमदारांना फोडले, लोकशाहीला काळीमा लावण्याचे काम केले आहे. शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, अजून या संदर्भात आमच्यात काही चर्चा झालेली नाही.
शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याची काँग्रेसची भूमिका राहील
शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी ४२ आमदारांसह बंड केल्याचे समोर आले आहे. या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली असल्याचे दिसत आहे. या बंडामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये असलेले १७ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. येत्या २४ तासात त्या आमदारांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंसमोर त्यांची मागणी मांडली तर विचार केला जाईल असं सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. या विधानावरुन आता राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. राऊत यांच्या या विधानावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Prithviraj Chavan News in Marathi)
संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी साम टीव्हीला प्रतिक्रीया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आहे की, नाही या बद्दल प्रश्नचिन्ह आहे. मुख्यमंत्र्यांकडे बहुमत राहीलेले नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका आता महत्वाची ठरणार आहे. शिवसेना बाहेर पडायला तयार असेल तर पर्यायी सरकार भाजपसोबत स्थापन करणार का? हा प्रश्न आहे. मी जेवढं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओळखतो ते भाजपच्या दबावाखाली जाऊन सरकार बनवणार नाहीत. त्यांना जायचे होते तर ते याअगोदरच गेले असते.
Edited By- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.