Eknath Shinde group Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेना हरता कामा नये, शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये; शिवसेना महिला नेत्याच ट्विट

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेतील (ShivSena) ४० आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे, तर दुसरीकडे भाजपसोबत जात शिंदे गट सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे.

'माननीय शिवसेना आमदार महोदय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन, युती झाली तर पुढची साडेसात वर्षे सत्तेची मग शिवसेनेला त्यात मुख्यमंत्रीपद असणार का? बहुमताची चाचणी करण्याअगोदर पक्ष प्रमुखांशी बोलणार का? आदरणीय शिंदे साहेब शिवसेना हरता कामा नये. शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये, असं ट्विट (Tweet) दिपाली सय्यद यांनी केले आहे.

भाजप (BJP) आणि शिंदे गट एकत्र येत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमताची चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यात सत्तापालट होणार असल्याचे बोलले जात आहे.

आज गुवाहाटीमध्ये असलेले बंडखोर आमदार गोव्याला जाणार आहेत, आणि उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यपालांच्या पत्राला मविआ सुप्रीम कोर्टात देणार आव्हान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. राज्यपालांच्या या पत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाने ११ तारखेपर्यंत आहे तशी परिस्थिती राहिली पाहिजे असे निरिक्षण दिले होते, त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक थोड्यावेळात सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी शेवटपर्यंत ही लढाई लढणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या पत्राला आव्हान देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : ज्वेलर्सच्या दुकानात शस्त्रासह दरोडा टाकण्याचा प्रयत्न; रावण टोळीतील ९ जण पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Live News Update: पुण्यात बंजारा समाजाचे आरक्षण मागणीसाठी आंदोलन

GK: जगातील सर्वाधिक तलाव असलेला देश कोणता? जाणून घ्या सविस्तर रंजक माहिती

Samruddhi Kelkar: जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साजे केसात...

Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT