राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडी अ‍ॅक्शनमोडमध्ये; सुप्रीम कोर्टात देणार आव्हान

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले आहे.
Mahavikas Aghadi News, Maharashtra Political Crisis News, MVA News
Mahavikas Aghadi News, Maharashtra Political Crisis News, MVA NewsSaam Tv
Published On

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. राज्यपालांच्या या पत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाने ११ तारखेपर्यंत आहे तशी परिस्थिती राहिली पाहिजे असे निरिक्षण दिले होते, त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिसत आहे.(Maharashtra Political Crisis News)

दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक थोड्यावेळात सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी शेवटपर्यंत ही लढाई लढणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या पत्राला आव्हान देण्यात येणार आहे.

Mahavikas Aghadi News, Maharashtra Political Crisis News, MVA News
Floor Test: मोठी बातमी! राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवलं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे काल राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी अधिवेशन बोलावून बुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. (Maha vikas Aghadi News)

महाविकास आघाडी (Mahavikas Aghdi) आता राज्यपाल यांनी दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाणार आहे. राज्यपालांचा आदेश मान्य नाही अस महाविकास आघाडीने म्हटले आहे. राज्यपालांच्या आदेशाला कोर्टात आव्हान देण्याचे अधिकार आहेत का हे सुप्रीम पडताळून पाहिलं. ११ तारखेपर्यंत परिस्थिती आहे तशी राहिली पाहिजे, असं कोर्टाने निरिक्षण दिले होते, पण आता बहुमत चाचणी घेण्याचे पत्र राज्यपालांनी पाठवले आहे. महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सहजासहजी सरकार सोडणार नाहीत अस दिसत आहे.

Mahavikas Aghadi News, Maharashtra Political Crisis News, MVA News
Eknath Shinde : आम्ही उद्याच मुंबई येऊ; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवलं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. उद्याच बुमत सिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे काल राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com