Eknath Shinde, Devendra Fadnvis
Eknath Shinde, Devendra Fadnvis Saam Tv
मुंबई/पुणे

अखेर शिंदे सरकारचा खातेवाटपाचा मुहूर्त ठरला; महसूल, गृह खातं कुणाला?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सत्तास्थापनेच्या तब्बल एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला. शिंदे गटातील ९ तर भाजपमधील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, आता खाते वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. भाजप स्वत:कडे मोठी खाती ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. खाते वाटप आज सायंकाळी होणार असल्याचे बोलले जात आहे. (Eknath Shinde Latest News)

आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठका सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीस महसूल खात्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटही महसूल खात्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तर काही खात्यावर अजुनही तिढा कायम असून, आज दुपारपर्यत हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. हा तिढा आज सुटला तर सायंकाळपर्यंत खातेवाटप होऊ शकते.

खाते वाटपाची संभाव्या यादी सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वत:कडे गृह आणि अर्थ खाते ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुधीर मुनगंटीवर यांना उर्जा खाते, विखे-पाटील यांना महसूल खाते शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना उद्योग खाते मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही असतील संभाव्य खाती, सूत्रांची माहिती अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही

1) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)

2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ

3) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, सहकार

4) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन

5) चंद्रकांतदादा पाटील - सार्वजनिक बांधकाम

6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास

7) गिरीश महाजन - जलसंपदा

8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा

9) दादा भुसे- कृषी

10) संजय राठोड- ग्राम विकास

11) सुरेश खाडे - सामाजिक न्याय

12) संदीपान भुंभरे- रोजगार हमी

13) उदय सामंत - उद्योग

14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री

15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण

16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास

17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण

18) अतुल सावे - आरोग्य

19) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क

20) मंगलप्रभात लोढा- विधी न्याय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

SCROLL FOR NEXT