शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा, हा महत्वाचा निर्णय

आजच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार - CM शिंदे
Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP
Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJPSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षितेखाली झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसचं मुंबई मेट्रो मार्गिका -3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने मोठा दिलासा दिला असून आता दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्यात येणार आहे. शिवाय एनडीआरएफच्या (NDRF) मदतीपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना १३,६०० रुपयांची मदत मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत करत बैठकीला सुरुवात केली.

Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP
'हिंदुत्वासाठी गेलात तर...'; जयंत पाटलांनी लगावला शिंदे गटातील नाराज आमदारांना टोला

दरम्यान, बैठकीत कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो (Mumbai Metro) मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पाच्या मूळ खर्चात 23 हजार 136 कोटींनी वाढ झाल्याने आता 33 हजार 405 कोटी 82 लाख रुपयांचा हा सुधारित खर्च असेल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे.

ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ 50 मिनिटात करणे सहज शक्य होणार आहे. सध्या बोगद्यांचे 98.6 टक्के एवढे काम झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे 82.6 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी 73.14 हेक्टर शासकीय जमिन व 2.56 हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com