'हिंदुत्वासाठी गेलात तर...'; जयंत पाटलांनी लगावला शिंदे गटातील नाराज आमदारांना टोला

बच्चू कडू ऐकणार नाहीत. मंत्री होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत - जयंत पाटील
Jayant Patil Statement
Jayant Patil StatementSaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: हिंदुत्वासाठी गेले आहेत तर त्यासाठी त्याग केला पाहिजे, वाईट वाटून घ्यायला नको असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नाराज आमदारांना टोला लगावला आहे.

काल अनेक शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला. या मंतत्रिमंडळ विस्तारात अनेक आमदारांना डावलल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर हे नाराज आमदार आता 'मातोश्री'च्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

याच नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमिवर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बऱ्याच शिंदे समर्थक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. हिंदुत्वासाठी गेले तर त्यासाठी त्याग करायला हवा, वाईट वाटून घ्यायला नको. शिवाय बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची नाराजी स्वाभाविक आहे. तसंच बच्चू कडू ऐकणार नाहीत. मंत्री होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत असंही पाटील म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

तसंच त्यांनी यावेळी त्यांनी बिहारच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं ते म्हणाले, त्या घटनेवर इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य नाही. मधला काळ मोठा आहे. नितीश कुमार यांनी आघाडी करणे आणि भाजप हातून राज्य जाणे महत्वाची घटना आहे.

बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी -

एकनाथ शिंदेंसोबत पहिल्यांदा गेलेल्या आमदारांना वगळून नंतर गेलेल्या आमदारांना मंत्री पद देण्यात आल्यामुळे देखील काही आमदार नाराज आहेत. तर काल याच मुद्द्यावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती.

Jayant Patil Statement
शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या संपर्कात? ही असू शकतात कारणं...

काल साम टीव्हीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 'मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या अपक्ष आमदारांना मंत्री पद मिळणे अपेक्षित होते. आम्ही अडचणी समजू शकतो. जे आमदार सोबत गेले त्यांची नाराजी तर असणारच. जे एकनाथ शिंदे गटासोबत पहिले गेले ते मागे राहिले आणि मागून आलेले पुढे गेले.'

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com