Eknath Shinde Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

मंत्रिपदासाठी अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्रीच घेतली होती भेट

सत्तास्थापनेच्या एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सत्तास्थापनेच्या एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला. शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर रात्रभर शिंदे गटातील आमदारांचे खलबते सुरू होते, अशा चर्चा सुरू आहेत.

मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समजूत काढली असल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी मंत्रिपदासाठी दावा केला होता, पण काल अनेकांचा पत्ता कट झाला त्यामुळे आता नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला तेव्हा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली, नांदेड दौऱ्यावर गेले होते. ते सोमवारी दौरा करुन रात्री मुंबईत दाखल झाले. यानंतर मध्यरात्री मुंबईत नंदनवन बंगल्यात खलबते सुरू झाली.

काही दिवसापूर्वी टीईटी घोटाळा समोर आला होता, या घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे असल्याची बातमी आली होती, त्यामुळे सत्तार यांचा मंत्रिपदावरुन पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. (Eknath Shinde Latest News)

यानंतर अब्दुल सत्तार यांनी मुंबईला जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. मध्यरात्री मंत्रिपदाबाबत चर्चा केली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सह्याद्री बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या यादीत सत्तार यांच्या नावाचा समावेश केला असल्याचे बोलले जात आहे.

आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदाच्या नावाच्या यादीत समावेश नसल्याचे समजताच शिरसाट संतप्त झाले होते. त्यांची समजूत काढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील संतप्त झाले होते असं बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मे महिना संपत आला, लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: मुंबई आग्रा महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात , सहा जणांचा मृत्यू

Palghar Tourism : पालघरमधील महाबळेश्वर पाहिलंय का? सुट्ट्या संपण्याआधी 'हे' थंडगार ठिकाण नक्की फिरा

Pune curfew : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

Kangana Ranaut-Aishwarya Rai : "ती तुम्हाला खुश करण्यासाठी इथे आलेली नाही..."; ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना कंगना रणौत यांचं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT