Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

ठाकरे-शिंदे संघर्ष टळणार; शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी दुसऱ्या ठिकाणी होणार

मुख्यमंत्र्यांनी नंदनवन या निवासस्थानी शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांची एक महत्वाची बैठक बोलावली आहे.

Jagdish Patil

सुशांत सावंत -

मुंबई: शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली. शिंदे गटाने शिवसेना पक्षासह चिन्हावर देखील आपलाच अधिकार असल्याचा दावा केला आहे.

शिवाय आता शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन (Shivsena Bhavan) देखील उभारणारणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasra Melava) यंदा कोण घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडीओ -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) यंदा दसरा मेळावा घेणार आहेत. मात्र, हा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कऐवजी (Shivaji Park) दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा शिंदे गटाचा विचार सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) होणारा थेट संघर्ष टाळत शिंदे गट दुसरीकडे दसरा मेळावा घेणार असल्याचं समजतं आहे.

याच पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्र्यांनी नंदनवन या निवासस्थानी शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांची एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत यंदाचा दसरा मेळावा घ्यायचा की नाही आणि घेतल्यास तो शिवाजी पार्क व्यतिरिक्त कोठे घेता येईल याबाबतचा बैठकीमध्ये आजच्या निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दसरा मेळाव्याचा अधिकार आमचाच - शिंदे गट

तर आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आम्हालाच असून याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे.

शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा - उद्धव ठाकरे

तर कुणी कितीही संभ्रम निर्माण करु देत, शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा होणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT