मान हा हट्ट आणि दमदाटी...; शिंदे गटातील आमदाराला जयंत पाटलांचा जोरदार टोला

मला नाही वाटत ते परत येतील, ते एकदा गेलेले आहेत, त्यांचे काही व्यवहार ठरले असतील.
Jayant Patil Criticized To Shinde Group's MLA
Jayant Patil Criticized To Shinde Group's MLASaam TV
Published On

चेतन व्यास -

वर्धा: मान हा मागून, हट्ट आणि दमदाटी करून मिळत नसतो. तो लोकांच्या मनात असावा लागतो, हे काही लोकांना कळत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना टोला लगावला.

जयंत पाटील हे आज वर्ध्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आले होतें यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिली. औरंगाबादमधील एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे स्वागत पहिल्यांदा केल्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे भर कार्यक्रमातून उठून गेले होतें.

याच प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, 'मान हा मागून मिळत नसतो. मान हट्ट आणि दमदाटी करूनही मिळत नसतो. तो लोकांच्या मनात असावा लागतो. हे काही लोकांना कळत नाही त्यांना तुम्ही आणी मी काय करणार असा टोला त्यांनी शिरसाटांना लगावला.

पाहा व्हिडीओ -

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतर शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, 'मला नाही वाटत ते परत येतील, ते एकदा गेलेले आहेत, त्यांचे काही व्यवहार ठरले असतील, हिशोब ठरले असतील, करार ठरले असतील आणि त्या कराराप्रमाणे सगळं होत असेल अशी आमची अपेक्षा आहे. असा खोचक टोला लगावला.

काय आहे प्रकरण -

औरंगाबादमध्ये (Aurangabad) गणेशोत्सवाच्या अनुशंगाने पोलिस प्रशासनाकडून शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला सुरवात होताच, आयोजकांकडून उपस्थितांच्या सत्कार समारंभाला सुरवात झाली.

Jayant Patil Criticized To Shinde Group's MLA
Mumbai | मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

पोलिस प्रशासनातील एका अधिकाऱ्याने चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा पहिल्यांदा सत्कार केल्यामुळे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट नाराज झाले, हा सत्कार प्रोटोकॉलनुसार नसल्याचं म्हणत शिरसाट कार्यक्रम सोडून निघाले होते. मात्र, उपस्थितांनी मध्यस्ती केल्यावर ते कार्यक्रमासाठी थांबले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com