shivsena political news Saam tv
मुंबई/पुणे

महापालिका निकालानंतर मोठा राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

kalyan crime news : महापालिका निकालानंतर मोठा राडा झालाय. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

कल्याणमध्ये निकालानंतर मोठा राडा

निकालानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

जीवघेणा हल्ल्यात शिंदे गटाचा कार्यकर्ता जखमी

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील कैलासनगरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. अंबादास कांबळे असे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. जखमी अंबादास कांबळे यांना हल्ल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिंदे गटाचे कार्यकर्ते अंबादास कांबळे यांना जीवघेणी मारहाण झाली. किरण पावशे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. किरण पावशे हा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक नागरिकांनी जखमी अंबादास कांबळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे निवडणूक निकालानंतरही राजकीय वादाला हिंसक वळण लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जखमी अंबादास कांबळे यांनी आरोप करताना म्हटलं की, 'किरणने जातीवरून शिवीगाळ केली. त्यानंतर जीवेमारण्याची धमकी दिली. निवडणुकीत शिंदे गटाचं काम केल्याने मारहाण केली. त्याने लोखंडी फायटरने मारहाण केली. त्या एकट्यानेच मारहाण केली.

लातूरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर हल्ला

लातूर महानगरपालिकेचा निकाल जाहीर होताच काल वार्ड क्रमांक 1 मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. लातूरमधील वार्ड क्रमांक एक मध्ये भाजपचे निरीक्षक विजयकुमार जगताप यांच्या घरावर काही गावगुंडांनी हल्ला केला. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. यादरम्यान वार्ड क्रमांक एकमध्ये भाजप एक आणि काँग्रेस तीन जागेवर विजयी झाले. त्यानंतर रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात लातूरच्या गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

Maharashtra Live News Update: भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला - एकनाथ शिंदे

ZP निवडणुकीआधी मोठी उलटफेर; राष्ट्रवादीमध्ये पुन्हा भाकरी फिरणार, संघटनेत नव्या नियुक्त्या होणार

मोठी बातमी! पुण्यानंतर आणखी एक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर, कारण काय?

Bus Accident: वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

SCROLL FOR NEXT