CM Eknath Shinde And Pratap Sarnaik
CM Eknath Shinde And Pratap Sarnaik Twitter/@purveshsarnaik
मुंबई/पुणे

Pratap Sarnaik : आमदार प्रताप सरनाईक पुन्हा ईडीच्या रडारवर? ११ कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

Pratap Sarnaik ED News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा ईडीच्या रडावर असल्याची माहिती आहे. एनएसईएल घोटाळा प्रकरणी ईडीच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात ईडीकडून प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची ११ कोटींची संपत्ती जप्त केली जाण्याची शक्यता आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील दोन फ्लॅट आणी मीरारोडमधील प्लॉटवर जप्ती येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ईडी कारवाई टाळण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याची जोरदार चर्चा होती. असं असताना सुद्धा सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई होणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार अस्तित्वात असताना, शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात किरीट सोमय्या यांनी रान उठवलं होतं. अगदी त्यांना जेलमध्ये धाडण्याची भाषा केली होती. पण दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन सत्तास्थापन केली. आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव आदींनी शिंदे गटात जाणं पसंत केलं. त्यानंतर त्यांच्या ईडी चौकश्या सुद्धा बंद झाल्या असल्याची चर्चा होती.

यापूर्वीही झाली होती ईडी चौकशी

दरम्यान, यापूर्वी सुद्धा आमदार प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी झाली होती. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या.

ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सेवानिवृत्त ब्रिगेडीयरने शेतकऱ्यांना घाबरण्यासाठी झाडल्या गोळ्या

Pakistan Privatisation: दिवाळखोरीमुळे पाकिस्तान हैराण! सरकारी कंपन्या काढल्या विक्रीला, आर्थिक संकटामुळे खासगीकरणाकडे वाटचाल

RR vs PBKS: राजस्थान संघाची संथ फलंदाजी; पंजाबसमोर १४५ धावांचे आव्हान

Benifits of Curd in Morning: सकाळी रिकाम्या पोटी दही खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क

Uddhav Thackeray: पंतप्रधान मोदींनी १० वर्षे देशाला फसवलं; नाशकातून उद्धव ठाकरेंनी मोदींवर डागली टीकेची तोफ

SCROLL FOR NEXT