chief minister Eknath Shinde Group
chief minister Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Maharastra Politics : मंत्रिपदावरून शिंदे गटातील आमदार नाराज; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यातील प्रलंबित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आज अखेर मुहुर्त मिळाला. आज पहिल्या टप्प्यात भाजपच्या ९ आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला असून ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली . दरम्यान, पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची माळ गळ्यात न पडल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Cabinet Expansion LIVE Updates)

पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरील शिंदे गटातील आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेल्या आमदारांमध्ये नाराजीचा उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपदाची संधी हुकल्यामुळे प्रचंड नाराज झाल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे या बैठकीत ज्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार नव्हतं, त्यांची समजूत काढत होते. त्याचवेळी संजय शिरसाटांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्या बंडखोरांनी मागचा पुढचा विचार न करुन तुम्हाला मदत केली, त्यांच्याच वाट्याला मंत्रिपद नाही, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी बैठकीत पाच ते दहा मिनिटं तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांत संजय शिरसाट हे शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आक्रमकपणे हल्ला चढवताना दिसत होते. त्यामुळे संजय शिरसाट यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के मानले जात होते. परंतु, आता मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट झाल्याचे समजते. दरम्यान, आता पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारातील संधी गेल्यानंतर संजय सिरसाट यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT