Crime news Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; शिंदे गटाच्या नेत्याला 50 लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक

mumbai Police Arrested former corporator : मुंबई पोलिसांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक केली आहे. माजी नगरसेवकाला खंडणी प्रकरणात अटक केली आहे.

Vishal Gangurde

मुंबईतील एमआयडीसी पोलिसांकडून मोठी कारवाई

पोलिसांनी शिंदे गटाच्या नेत्याच्या मुसक्या आवळल्या

शिंदे गटाच्या नेत्यावर खंडणीचा आरोप

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबई पोलिसांनी शिंदे गटाच्या नेत्यावर मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी खंडणी प्रकरणात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. माजी नगरसेवकावर ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

गेल्या काही काळापासून सतत वादग्रस्त ठरत असलेल्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अखेर एमआयडीसी पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे. एका बांधकाम प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून तब्बल पन्नास लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बांधकाम साइटवरून माजी नगरसेवक कमलेश राय यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात राय यांनी आठ लाख रुपये स्वीकारले होते. आज शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील पाच लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडलं. एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करत अटक केली.

कोण आहेत कमलेश राय?

कमलेश राय हे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत. मात्र त्यांच्या विरोधात यापूर्वीही वादग्रस्त कारभाराबाबत तक्रारी होत्या. आता थेट खंडणीसारख्या गंभीर आरोपात त्यांना अटक झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचाही शोध घेतला जातोय.

कमलेश राय कोण आहेत?

कमलेश राय शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत.

कमलेश राय यांच्यावर काय आरोप आहेत?

कमलेश राय यांच्यावर बांधकाम ठेकेदाराकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप आहे.

कमेलश राय यांना पोलिसांनी कशी अटक केली?

पोलिसांनी सापळा रचून कमलेश यांना ५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT