Eknath Shinde News  Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde: शिंदे गटाने आयोगाला दिली ३ नावे; तिन्ही नावांमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Jagdish Patil

शिवाजी काळे -

Eknath Shinde News : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाने आपल्या गटासाठीची नवीन नावाची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे.

अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने देखील आपल्या गटासाठीचं नावं सुचवली असून त्यानुसार बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची ही तीन नावं आता शिंदे गटाने आयोगाला पाठवली आहेत.

पाहा व्हिडीओ -

तर काल ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावं पाठविण्यात आली आहेत. महत्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाने पाठवलेल्या नावांमध्ये देखील बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख आहे.

त्यामुळे आता नवा पेच आयोगासमोर उपस्थित होणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल ही तीन चिन्ह तर शिंदे गटाकडून उगवता सूर्य, तुतारी, तलवार, गदा ही चिन्हं सुचविण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video

SCROLL FOR NEXT