Maharashtra Political Crisis Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde : बंडखोर आमदारांसोबत दगाफटका होणार?; मनसे नेत्याचं सूचक ट्विट

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक फोटो शेअर करत सूचक ट्विट केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devandra Fadnavis) यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहे. भाजपच्या मागणीनंतर आता राज्यपालांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहत उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरोधात शिवसेना कोर्टात गेली आहे. सध्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण उद्याच मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक फोटो शेअर करत सूचक ट्विट केलं आहे. (Shivasena Floor Test Latest News)

राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. गेल्या 8 ते 9 दिवसांपासून गुवाहाटी येथे तळ ठोकून बसलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहे. अशातच उद्या फ्लोअर टेस्ट होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत सूचक ट्विट केलं आहे. या पोस्टमध्ये बंडखोर आमदारांसोबत दगाफटका होईल असं अप्रत्यक्षपणे म्हणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, बहुमत चाचणीसाठी उद्या विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहे. सरकार वाचवण्यासाठी एकीकडे शरद पवारांच्या घरी बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. (Eknath Shinde Latest News)

शिवसेनेत बंडखोरी उफाळून आल्यानंतर भाजपने त्यांच्या आमदारांना राज्यातच थांबण्याचे आदेश दिले होते. आता बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमदारांना ताज हॉटेलमध्ये जमण्यास सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ्लोअर चाचणीबाबत पत्र दिल्याने पत्रावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. आमदारांच्या कारवाईवर दोन आठवड्यांचा वेळ दिला आणि बहुमत चाचणीला २४ तासांचा वेळ दिला, यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. ही याचिका जेव्हा लिस्टेड होणार तेव्हा ही याचिका घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT