राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात होणाऱ्या महत्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्वाच्या प्रकल्पावर चर्चा आयोजित केली होती. या बैठकीला अजित पवार पोहोचले, परंतु एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत गृहप्रकल्पांवर चर्चा होणार होती. या संबंधित खाते एकनाथ शिंदे यांच्याजवळच आहे. परंतु शिंदेच बैठकीला उपस्थित नव्हते. दुसरीकडे शिंदे गटाकडून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठकीला हजेरी लावली. मागील आठवड्याच्या कॅबिनेट बैठकीलाही एकनाथ शिंदे पोहोचले नव्हते. आता दुसऱ्यांदा महत्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी २०२२ साली भाजपला साथ दिली होती. त्यानंतर राज्यात एनडीएच्या सरकारची स्थापना झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री होण्याची संधी एकनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे काही दिवस नाराज असल्याचीही चर्चा होती.
महायुतीत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रचंड प्रयत्न केले. पुढे एकनाथ शिंदे आजारी पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मौन धारण केलं.
सध्या एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 'टायगर ऑपरेशन' राबवण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.