Jayant Patil  SAAM TV
मुंबई/पुणे

Jayant Patil ED Notice: मोठी बातमी! जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

सोमवारी चौकशीला हजार राहण्याचे आदेश

Shivani Tichkule

Breaking News: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना सोमवारी चौकशीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking Marathi News)

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. आजच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे. अशातच जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने (ED) नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे. राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक नेत्यांना धक्का बसला आहे.

प्रकरण नेमकं काय?

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 

दरम्यान यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळेच ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं स्प्ष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solo Trip Places : सोलो ट्रिपचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणी नक्कीच जा

Kazakhstan Tourism: लोणावळा-खंडाळा सोडा, 'या' ठिकाणी करा हॉलिडे प्लॅन; तुमचे १० हजार होतील ५८ हजार; वाचा संपूर्ण माहिती

Peanuts Benefits: हिवाळ्यात रोज शेंगदाणे खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

New Labour Rules : पीएफ वाढणार, पण हातात येणार पगार कमी होणार, नव्या कामगार कायद्यामुळे CTC चं गणित बदलणार

Yellow Batata Bhaji: उकडलेल्या बटाट्याची पिवळी झणझणीत भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT