शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना EDची नोटीस Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना EDची नोटीस

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजाविण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. आधी खासदार भावना गवळी MP Bhavana Gawali आणि त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांची सध्या ईडीकडून ED चौकशी सुरू आहे. यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ Former MP Anandrao Adsul यांना ईडीकडून समन्स बजाविण्यात आले आहे. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी City Cooperative Bank Scam आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप आहे.

काय आहे नेमकं प्रकरण;

'सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, 99 टक्के मराठी लोकांचे खाते होते. त्यामुळे जवळपास 9 हजार खातेधारक Account Holder होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले आणि त्यात अडसूळांनी 20 टक्के कमिशन घेतले यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास 980 कोटींचा घोटाळा झाला. दोन वर्षांपूर्वी एफआयआर FIR झाले आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा Shivsena CM असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती', असा आरोप आमदार रवी राणा Ravi Rana यांनी केला आहे.

मात्र, कुठल्याही प्रकारची अटक आनंदराव अडसूळ यांना झालेली नाही. ही रवी राणा यांनी पेरलेली माहिती आहे, असेआनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ Abhijit Adsul यांनी म्हटलं आहे.

अडसूळांनी फेटाळले आरोप -

सीटी बँकेत 980 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अडसूळ यांनी फेटाळून लावला आहे. सीटी बँकेत 800 कोटींची उलाढाल होती. मग 980 कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो? असा उलटं सवाल त्यांनी केला. तर आज सकाळीच ईडीचे अधिकारी Officers Of ED माझ्या घरी आले. त्यांनी मला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे स्वतः अडसूळ यांनी सांगितलेआहे.

अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली;

आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर Investigation ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या Mumbai घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये Goregaon Life Care Hospital त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT