नाशिक : नाशिकमधून Nashik धर्मांतराचे रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली एक तरुणाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश Uttar Pradesh एटीएस ATS पथकाने रविवारी रात्री ही कारवाई केली आहे. एका तरुणाला नाशिकरोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी ताब्यात घेणयात आलेल्या तरुणाचे नाव आतिफ असल्याचं समोर आलं आहे. तर तो नाशिकमध्ये कुणाल या नावाने वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
व्हिडीओ-
उत्तर प्रदेश एटीएस पथकाची कारवाई;
नाशिक पोलिसांना Nashik Police आंधारात ठेवून उत्तर प्रदेश एटीएस Uttar Pradesh ATS पथकाने ही कारवाई केली आहे. यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. एटीएसच्या पथकाला संशय आला होता होता की, धर्मांतर प्रकरणात आतिफचा हात आहे. त्याप्रकरणी त्याला अटक Arrest करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आतिफच्या खात्यात विदेशातून कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत अशीही माहिती समोर आली आहे. हे पैसे नेमके कुठून आले याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
आतिफ हा कुणाल या नावाने वास्तव्य करत होता;
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोडमध्ये आनंदनगर येथे आतिफ हा कुणाल या नावाने वास्तव्य करत होता. काल रविवारी रात्री उशीरा ATS ने त्याला सापळा रचला आणि त्याला अटक केली. तसेच त्याच्या खात्यात विदेशातून विविध खात्यांमधून तब्बल २० कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.
एटीएसला अशी माहिती मिळाली होती की, मेरट येथून गेल्या आठवड्यात ताब्यात घेतलेल्या कलीम सिद्दकी याच्यासोबत आतिफ धर्मांतर रॅकेटमध्ये काम करत होता. आतिफने रशियातून Russia मेडिकलचं Medical शिक्षण घेतलं आहे. तो तेथे सध्या अवैद्यरित्या डॉक्टरीची प्रॅक्टिस करत होता. या ठिकाणी तो रुग्णांना, धर्मपरिवर्तनासाठी Conversion प्रवृत्त करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.