ED (Enfroecement Directorate) Action on Baramaenti Agro Saam TV
मुंबई/पुणे

ED on Baramati Agro: ईडीची मोठी कारवाई; बारामती अॅग्रोची ५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ED Action Today Latest News : ईडीच्या मुंबई कार्यालयाने बारामती अॅग्रोविरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने बारामती अॅग्रोची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने १६१ एकर जमीन ईडीने जप्त केली आहे.

Vishal Gangurde

ED Action on Baramati Agro News in Marathi:

ईडीच्या मुंबई कार्यालयाने बारामती अॅग्रोविरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने बारामती अॅग्रोची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने १६१ एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. ही जमीन जवळपास ५०.२० कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. (Latest marathi News)

ईडीने एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत बारामती अॅग्रोविरोधात कारवाई केल्याची माहिती दिली. ईडीने बारामती अॅग्रो कंपनीची मुंबई, कन्नड, छत्रपती संभाजीनगर येथील मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत १६१.३० एकर जमीन, मशिनरी, साखर कारखान्याची इमारत जप्त केली आहे. बारामती अॅग्रोची ही एकूण ५०.२० कोटी किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

बारामती अॅग्रो या कारखान्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार राम शिंदे यांनी केली होती. राम शिंदेंनी याबाबतचं निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले होते. १५ ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरु केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश होते. तरीही त्याआधी कारखाना सुरु केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडून करण्यात आली होती.

१५ ऑक्टोबर पूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरु केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असतानाही बारामती ॲग्रो लि. हा कारखाना 10 ऑक्टोबर 2022 रोजी सुरु करण्यात आला. त्यामुळे या कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागमी आमदार शिंदेंनी केली होती.

ईडीकडून कन्नड सहकारी कारखाना जप्त

छत्रपती संभाजीनगरमधील साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कारखान्याने तब्बल ५० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यानंतर बारामती अॅग्रोचे कार्यकारी व्यवस्थापकांना ईडीने समन्स बजावले होते. तसेच ईडीने ५ जानेवारी रोजी या प्रकरणावरून चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT