Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut Big Breaking : संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. ही ईडीची मोठी कारवाई मानली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. ही ईडीची मोठी कारवाई मानली जात आहे. ईडीनं राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील दादर येथील संपत्ती जप्त केली आहे.

ईडीकडून (ED) राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया सुरू असतानाच, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. राऊत यांची अलिबाग येथील मालमत्ता आणि दादर येथील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटवर ईडीनं टाच आणली आहे. ही आतापर्यंतची ईडीची सर्वात मोठी कारवाई आहे.

अलिबागमधील जमिनी आणि इतर मालमत्ता, तसेच दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीची काही दिवस चौकशी सुरू होती. गेली दोन महिने राऊत यांची जी धडपड, धावपळ, आणि ईडीवर आरोप करणे आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि कुटुंबीयांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकत होतो. अलिबागमध्ये चौकशी झाली त्यावेळी काय काय केलं हे सगळं माहीत होतं, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसंच राऊतांना या कारवाईबाबत आधीच लक्षात आले होते म्हणून त्यांनी 55 लाख ईडी कार्यालयात परत केले होते असा खुलासा देखील सोमय्या यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT