Anil Ambani Saam Tv
मुंबई/पुणे

अबांनींविरोधात ईडीची मोठी कारवाई, भल्या पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापेमारी

ED Action Against Anil Ambani: ईडीने उद्योगपती अनिल अंबानींविरोधात मोठी कारवाई केली. आज पहाटे ईडीने मुंबईतील १२ ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईमध्ये उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • ईडीने उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर मोठी कारवाई केली

  • मुंबईत १० ते १२ ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापेमारी

  • संआर्थिक व्यवहार आणि संशयास्पद निधी हस्तांतरणाची तपासणी सुरू

संजय गडदे, मुंबई

अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरोधात पुन्हा मोठी कारवाई केली. अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीने कारवाई सुरू केली आहे. आज पहाटे ईडीच्या पथकांनी मुंबईतील रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित १२ ठिकाणांवर छापेमारी केली. ईडीच्या या कारवाईमुळे उद्योग क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स पॉवरविरोधात कारवाई करण्यासाठी ईडीच्या सुमारे १५ पथकांनी आज पहाटेपासून शोध मोहीम सुरू केली. ईडीच्या पथकांनी मुंबईतील १० ते १२ ठिकाणी छापेमारी केली. ईडीने ही कारवाई वीज कंपनी रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित व्यक्तींच्या निवासस्थानी आणि कार्यालयीन ठिकाणी केली. याठिकाणी ईडीकडून छाडाछडती आणि कागदपत्रांची तापसणी सुरू आहे.

या छापेमारीदरम्यान आर्थिक व्यवहार आणि संभाव्य अनियमिततेबाबत कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून ईडीकडून पुढील तपास सुरू आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आली असताना देखील रिलायन्स पॉवरचे शेअर २ टक्क्यांनी वाढले असून २३ रुपयांवर पोहचले आहे. तर रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स ४ टक्क्यांवरून अधिक वाढले असून ९४.२० रुपयांवर पोहचले आहे.

ईडीची ही कारवाई मुंबई आणि हैदराबादमधील ठिकाणांवर केंद्रित होती. तपासात अडथळे येऊ नयेत म्हणून अनेक ठिकाणांचे पत्ते ईडीकडून सांगण्यात आले नाहीत. फेब्रुवारी २०२६ मध्ये ईडीने मुंबईतील पॉश एरिया असलेल्या पाली हिल परिसरातील अनिल अंबानी यांचे निवासस्थान अ‍ॅबोडवर कारवाई केली होती.

या कारवाईनंतर आता ईडीकडून मुंबईतील कंपनीशी संबंधित १२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. कथित आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगच्या व्यापक चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी सुरूच आहे. आज ईडीने टाकलेले छापे हे रिलायन्स पॉवरमधील संशयास्पद निधी हस्तांतरण आणि व्यवहारांच्या चौकशीता भाग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

Terror Alert : मोठी बातमी! टॉय कारमध्ये IED ठेवून हल्ल्याचा कट; महाराष्ट्र कनेक्शन उघड, ३ राज्यांतून चौघांना बेड्या

High Blood Pressure : BP कंट्रोल करण्यासाठी लाइफस्टाइमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, औषधांची गरजही भासणार नाही

Famous Actor Video : वाढलेले केस अन् हातात सुटकेस; बॉलिवूडचा सुपरस्टार रस्त्यावर भटकतोय, अवस्था पाहून ओळखणंही कठीण

Lung cancer symptoms: 5 अशी लक्षणं दिसतायत तर असू शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT