aaditya thackeray and devendra fadnavis
aaditya thackeray and devendra fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

देवेंद्र फडणवीसांचे वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis News : वेदांता प्रकल्पावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे देखील वेदांता प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहेत. वेदांता प्रकल्प गुजरातला नेला, महाराष्ट्र का पाकिस्तान झाला होता का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला. आदित्य ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यावरून आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसंवाद यात्रेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. 'वेदांता' प्रकल्प गुजरातला नेला, महाराष्ट्र का पाकिस्तान झाला होता का ? अशी बोचरी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती.

आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मुळात महाराष्ट्राची तुलना आदित्य ठाकरे हे पाकिस्तानशी करत आहेत. याचं मला आश्चर्य वाटते. एकदा अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी केली होती. त्यानंतर किती हंगामा झाला होता'. या टीकेची आठवण फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना करून दिली.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. 'पंतप्रधान मोदी हे ओबीसी नाहीत, लवकरच पुरावे देऊ', असा दावा नाना पटोले यांनी केला होता. पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'नाना पटोले हे दिवसात एक-दोनदा बोलत असतात. त्यामुळे त्यांनी बोललेलं गांभीर्याने घ्यायचं नसतं'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT