Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच होईल; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

पाकव्याप्त काश्मीर देखील भारताचाच होईल. सर्वांनी विभीषिका दिवस पाळायचा आहे. अखंड भारताचे स्वप्न नरेंद्र मोदींना पूर्ण करायचं आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Devendra Fadnavis News : 'केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्याने काश्मीर आज आमचं आहे. पाकव्याप्त काश्मीर देखील भारताचाच होईल. सर्वांनी विभीषिका दिवस पाळायचा आहे. अखंड भारताचे स्वप्न नरेंद्र मोदींना पूर्ण करायचं आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

मुंबईत मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर रवाना झाले. पुण्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व नाट्यमंदिरात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. बालगंधर्व नाट्यमंदिरातील या कार्यक्रमात भाजप समर्थकांची मोठी गर्दी झाली. या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

देवेंद्र फडणवीस संबोधित करताना म्हणाले, 'हर घर तिरंगा अभियान समाजासाठीचा मोठा उपक्रम आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर जेव्हा तिरंगा फडकत होता, तेव्हा अंगावर रोमांच उभा राहत होता. किल्ला जिंकल्यानंतर भगवा झेंडा फडकवला जायचा, तेव्हा तो किल्ला ताब्यात आला असं समजलं जायचं. आज तो मान तिरंग्याला आहे. सैनिक आजही तिरंग्यासाठी लढतात. 'एकही भारतातलं घर तिरंग्याशिवाय राहणार नाही' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निडर भारत दिसतोय'.

फडवीस यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 'राहुल गांधी विचारतात की, 'सर्जिकल स्ट्राइक' केल्याचा काय पुरावा ? तेव्हा सैनिकांच्या घरच्यांना काय वाटत असेल ?, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस पुढे म्हणाले, 'गलवानच्या घाटीत चीनला नमवलं. ही नवीन भारताची क्षमता आहे. तर केंद्र सरकारला पुढच्या २५ वर्षांचा विचार करायचा आहे. जीडीपी वाढविण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी घर, शौचालय बांधून दिले. वीज दिली. त्यातून भारताचा जीडीपी वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफकी निलंबन

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, बॅगचे स्कॅन अन् स्टिकर लावूनच करता येणार प्रवास; नाहीतर...

Union Budget 2026: यंदा देशाचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? वाचा तारीख आणि वेळ

Buldhana : पालकमंत्री मराठा असल्याची लाज वाटते ,महेश डोंगरेंचा संताप; जिजाऊ जन्मोत्सवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..

SCROLL FOR NEXT