Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

'२६/११ हल्ल्याची माहिती आपल्याकडे आधीच होती, पण...'; देवेंद्र फडणवीसांनी ठेवलं उणीवेवर बोट

उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी '२६/११ हल्ला आणि मुंबईच्या सुरक्षेवर मोठं विधान केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी '२६/११ हल्ला आणि मुंबईच्या सुरक्षेवर मोठं विधान केलं आहे. '२६/११ च्या हल्ल्याची माहिती आपल्याकडे आधीच होती. पण समन्वय नव्हतं. आपले अपयश लपवण्यासाठी सरकार अनेकदा असे रिपोर्ट लपवले जातात. मात्र, मी मुख्यमंत्री झाल्यावर त्या अहवालातील अंमलबजावणी सुरू केली, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११ च्या हल्ल्यावरून तत्कालीन सरकारच्या उणीवेवर बोट ठेवलं आहे. (Latest Marathi News)

मुंबईत पांचजन्य आयोजित २६/११ मुंबई संकल्प या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली. या कार्यक्रमात '२६/११ आणि मुंबई सुरक्षा' या विषयावर देवेंद्र फडणवीस भाष्य केलं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले, '२६/११ ही अशी जखम जी कधीच बरू होऊ शकत नाही. ते लाच्छंन कधीच दूर होऊ शकत नाही. ते कधीच विसरता कामा नये'.

देवेंद्र फडणवीसांनी 'फेस रिकग्निशन सिस्टिम' सुविधेवर देखील भाष्य केलं. 'आता दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू आहे. फेस रिकग्निशन सिस्टिम सुविधा सुविधा सीसीटीव्हीत असेल. त्यामुळे चेहरा ओळखता येईल. २०१९ साली दुसरा टप्पा सुरू होणार होता. अडीच वर्षात झाला नाही. कदाचित माझ्याच हस्ते हा टप्पा सुरु होणार असेल, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'सीसीटीव्ही लावण्याची शिफारस केली. २००८चा अहवाल आणि २०१४साली आम्ही सत्तेत आलो. एका वर्षात सीसीटीव्ही लागले. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व यंत्रणांची बैठक होते. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण होते. त्याचा फायदा सर्वांना होतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईमध्ये राज ठाकरेंना शिवीगाळ; परप्रांतीयाने तोडले अकलेचे तारे, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: धुळ्यात चोरट्यांनी धाडसी चोरी करत पाच तोळे सोन्यासह केली रोकड लंपास

बैलांसमोर नाचवल्या नर्तिका, ग्रामपंचायतीच्या छतावर डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीताच्या घटास्फोटवर वकिलाचा मोठा खुलासा; म्हणाले...

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? जाणून घ्या खास नैवेद्याची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT