ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवताना पॉर्न व्हिडिओ सुरु; पुण्यातील धक्कादायक प्रकार Saam Tv
मुंबई/पुणे

ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवताना पॉर्न व्हिडिओ सुरु; पुण्यातील धक्कादायक प्रकार

राजगुरुनगर येथील के टी एस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झुम अ‍ॅपवरुन ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक पॉर्नचा अश्लिल व्हिडिओ सुरु झाला.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने चिमुकल्यांपासुन ते मोठे विद्यार्थी ऑनलाईन Online शिक्षणात व्यस्त आहेत. अशातच राजगुरुनगर येथील के टी एस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झुम अ‍ॅपवरुन ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक पॉर्नचा अश्लिल व्हिडिओ सुरु झाला.

या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. याच दरम्यान शाळा व्यवस्थापनाने संबंध घटनेबाबत विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला मात्र घडलेल्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पालकांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

हे देखील पहा-

30 जुलै वेळ दुपारी 1:30 वाजता राजगुरुनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के टी एस इंग्रजी माध्यमाच्या 10 वी च्या विद्यार्थ्याना झुम अँप वरुन क्लास सुरु असताना अचानक अश्लील चित्रफित सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही याचा धक्का बसला. मात्र हा प्रकार कसा घडला याचा चौकशी करण्यासाठी पालकांसह शाळेने शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जातात. ऑनलाईन शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात झुम अ‍ॅ पचा वापर केला जात आहे.अशातच क्लास सुरु असताना असा धक्कादायक प्रकार घडल्याने यासंदर्भात शिक्षकांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे, मात्र शिक्षणाचे धडे गिरवण्याच्या काळात जर विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनावर अशा चित्रफितीने दुष्परिणाम होत असतील तर हे निश्चितच चुकीचं असल्याचे शाळेकडुन सांगण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्षपद जाणार? राजकीय घडामोडींना वेग

WhatsApp Spam Calls: WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन कॉल येतायेत? फक्त १ सेंकदात करा ही सेटिंग अन् राहा टेन्शन फ्री

Maharashtra News Live Update: अशोक खरातच्या ईडी तपासाबाबत महत्वाची घडामोड

Ashok Kharat: भोंदू खरातचे पालघर कनेक्शन उघड, विजयासाठी उमेदवारांनी घेतली होती भेट

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? बारामतीमधील बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT