Due to Maratha reservation farmers are allowed to sell farm produce directly in Mumbai, government issued circular  Saam Tv
मुंबई/पुणे

Shinde Government: मराठा आरक्षणामुळं शेतकऱ्यांना शेतमाल थेट‌ मुंबईत‌ विकण्याची‌ मुभा, सरकारनं काढलं परिपत्रक

Big News for Farmers: मराठा आंदोलनामुळे एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी मिळाव्यात यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सुरज सावंत

Maratha Reservation:

मराठा आंदोलनामुळे एपीएमसी मार्केटमध्ये (Agricultural produce market committee) विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्याच बरोबर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी मिळाव्यात यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अत्यावश्यक वस्तू घेऊन एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या गाड्या, या मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) व इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात मार्केटमध्ये पुरवण्यासाठी सरकारने मुभा दिली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा पनवेलनंतर थेट एमटीएचएल (अटल सेतू) मार्गे मुंबईत विविध भाजी मंडई आणि भाजी मार्केट पोहोचवण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत मधील मराठा आंदोलनामुळे, वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी व व्यापारी आणि मालवाहतूकदारांच्या शेतमाल व इतर खाद्यपदार्थांच्या वितरणासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व अधिनियम 1963 कलम 59 अन्वये तरतुदीमध्ये सूट देण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने एक परिपत्रक ही जाहीर केलं आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ''मराठा आरक्षणाच्या मागणी साठी निघालेले आंदोलक मुंबई परिसरात आलेले आहेत. आंदोलक नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सद्यसस्थितीत मुक्कामी आहेत. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतमालाची व इतर खाद्य पदार्थाची आवक व पर्यायाने व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. परिणामी, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्री साठी आणणा-या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्द व ठाणे महानगरपालिका हद्द व इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांना भाजीपाला व इतर दैनंदिन खाद्यपदार्थांचा संभाव्य तुटवडा टाळण्याकरीता परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत उपाय योजना / पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.''

यात पुढे सांगण्यात आलं आहे की, ''राज्यातील शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतमालाचे वेळेत वितरण करण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच वरील नमुद केलेल्या महानगरपालिका हद्दीतील ग्राहकांना दैनंदिन भाजीपाला, फळे व इतर सर्व खाद्य पदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी संचालक, पणन, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य, कृषी पणन मंडळ, पुणे व सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आपसात समन्वय साधुन आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व संबंधित महानगरपालिका यांच्यासोबत संपर्क करुन ग्राहकांपर्यंत उपरोक्त शेतीमाल पोहण्याबाबतची दक्षता घ्यावी.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सदा सरवणकर यांच्यावर सुषमा अंधारे यांची टीका

Maharashtra Politics: अजितदादा वाघ होते पण त्यांची नखं भाजपने काढली, उत्तम जानकरांची बोचरी टीका

Pune Election : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची संधी; महिना ८७००० रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

Ice cream ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT