Thane Water News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane News: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड; पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

विकास काटे, ठाणे

ठाणेकरांनो पुढील तीन दिवस पाणी जपून वापर. कारण ठाण्यात पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे.

दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे.

त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस (०९, १० आणि ११ जुलै, २०२४) अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले 530.26 क्यूमेकने पाण्याचा विसर्ग सुरू

दरम्यान, गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून 530.26 क्यूमेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रा जवळील गावांना तसेच आवागमन करणाऱ्यांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान धरण प्रशासना कडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

SCROLL FOR NEXT