Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: अंधेरीत अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक; तब्बल २ लाखांहून अधिक किंमतीचा साठा जप्त

काल रात्री साडेनऊच्या दरम्यान एका १९ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai: मुंबईत सर्रासपणे अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे. यात तरुणाई मोठ्या प्रमाणावर फसत असल्याचे समजत आहे. काल (शनिवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान एका १९ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे लाखोंचा अंमली पदार्थांचा साठा मिळाला आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. (Latest Mumbai News)

प्राप्त माहितीनुसार, मुंबईच्या डी.एन.नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अंधेरी (Andheri) पश्चिमेकडील कामा रोड परिसरात एक तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि अंमली पदार्थ विक्रेत्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल २.८५ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

आरोपीकडून 50 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.आरोपीने ड्रग्स कुठून आणले आणि तो कुणाला देणार होता याविषयीचा तपास आता डी एन नगर पोलीस (Police) करत आहेत. या प्रकरणी त्याच्या चौकशीत आणखीन मोठ्या रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडवीसांनी काढला थेट आदेश

Maharashtra Live News Update: नालासोपाऱ्याच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर हौशी जोडप्याची फजिती

Heartbreaking Story : मुलीचा संसार पत्त्यांसारखा कोसळला, जावयाने पाठवलेली नोटीस वाचून सासऱ्याला हार्ट अटॅक

WhatsApp: तुमच्या गर्लफ्रेंडने व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलंय? मग 'या' ट्रिक्सने करा मेसेज

SCROLL FOR NEXT