Babasaheb Ambedkar Jayanti 2023 saam tv
मुंबई/पुणे

Babasaheb Ambedkar Jayanti: डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टची विशेष व्यवस्था, दादर ते चैत्यभूमीपर्यंत अधिकच्या बसेस सोडणार

Ambedkar Jayanti 2023: आंबेडकर जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

Chandrakant Jagtap

>> रुपाली बडवे

Babasaheb Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवारी 14 एप्रिल रोजी जयंती आहे. यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमी परिसरात देशभरातून आणि विदेशातून देखील बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने येतात. ही बाब लक्षात घेऊन बेस्टकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टकडून अधिकच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. आंबेडकर जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी दादर स्टेशनपासून ते चैत्यभूमीपर्यंत अधिकच्या बसेस सोडण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळपासूनच अनुयायी मुंबईत दाखल व्हायला सुरुवात होते. त्यामुळे बेस्टकडून सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत दादरमध्ये अधिकच्या बसेस चालवण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल दर्शनासाठीसाठी देखील बेस्टने बसेसची व्यवस्था केली आहे.

बेस्टची ही बससेवा शिवाजी पार्कमधून असेल. या बसेसदक्षिण मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणांना भेट देतील. यासाठी नागरिकांना 150 रुपये मोजावे लागणार आहेत. बोरिवली स्टेशन ते कान्हेरी गुंफा दरम्यान देखील अधिक बसेस सोडण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महानायक होते. ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ होते. ते भारतीय संविधानाचे ते शिल्पकार आहेत. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू नगर येथे झाला होता. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई सकपाळ होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांसोबत होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी व्यापक चळवळ उभारली आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. याशिवाय महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी देखील त्यांना आवाज उठवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडा पाव मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

Maharashtra Rain Live News: सांगलीतील चांदोली धरण 93 टक्के भरले, धरणातून 11 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

SCROLL FOR NEXT