Gokhale Institute Dr Ajit Ranade  
मुंबई/पुणे

Pune Gokhale Institute: डॉक्टर अजित रानडेंना गोखले इन्स्टिट्युटच्या कुलगुरु पदावरुन तडकाफडकी हटवलं

Gokhale Institute Dr Ajit Ranade : जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ असलेल्या डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू पदावरुन हटवण्यात आले आहे.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर अजित रानडेंना कुलगुरू पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले आहे. अजित रानडे हे पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावर होते. डॉक्टर अजित रानडे हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ मानले जातात आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे . दोन वर्षांपूर्वी डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावर नियुक्ती करण्यात आली होती .

दरम्यान मराठा आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अनेक बैठकांना देखील अजित रानडे उपस्थित राहिले असून राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निकष आणि प्रश्नवली तयार करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता . पुण्यातील एडव्होकेट कौस्तुभ पाटील यांनी अजित रानडे यांच्या नियुक्तीला विरोध करत वेळोवेळी आंदोलन केलं होतं .

पदावरून का हटवलं ?

जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ असताना त्यांची अशी तडाकाफडकी का हटवलं असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र युजीसी केलेल्या कारवाईचं कारणही सांगण्यात आलंय. रानडे यांच्याकडे १० वर्षे प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा अनुभव नसल्याचं निदर्शनात आल्यानंतर त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. कुलगुरू या पदावर काम करण्यासाठी आवश्यक असलेले निकष त्यांच्याकडून पूर्ण होत नसल्याचं युजीसीला दोन वर्षानंतर लक्षात आले.

युजीसीचे एक पथक डॉक्टर अजित रानडे यांच्या नियुक्तीची माहिती घेण्यासाठी काल पुण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी दुपारी रानडे यांना पदावरून हटवण्याचा निर्णय गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतींनी घेतला. दरम्यान, रानडे फेब्रुवारी २०२२ मध्ये कुलगुरू म्हणुन नियुक्त झाली होती. ⁠रानडे यांच्या विरोधात गोखले इन्स्टिट्युटचे काही कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांनी कुलपती आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार केली होती. ⁠रानडे कुलगुरु पदाचे निकष पुर्ण करत नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. ⁠ त्यानंतर रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT