IIM Mumbai Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि अटी

IIM Mumbai Recruitment 2024 : मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत वित्त आणि लेखा व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर ऑफ फायनान्स अँड अकाउंट या पदासाठी मोठी भरती निघालीये.
IIM Mumbai Recruitment 2024
IIM Mumbai Recruitment 2024Saam TV
Published On

फायनान्समध्ये नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत वित्त आणि लेखा व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर ऑफ फायनान्स अँड अकाउंट या पदासाठी मोठी भरती निघालीये. त्यामुळे आज या बातमीतून सदर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

IIM Mumbai Recruitment 2024
Government Job Recruitements: सरकारी नोकरीची संधी; यूनियन बँक, MahaTranscoc मध्ये ७३६ जागांसाठी भरती

गेल्या अनेक दिवसांपासून या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे. सदर भरतीमध्ये कोणत्या व्यक्तींना अर्ज करता येणार आहेत? यासाठी वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता तसेच परीक्षा पास झाल्यावर उमेदवाराला किती वेतन मिळणार या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बातमीत मिळणार आहेत.

IIM Mumbai recruitment 2024 साठी किती जागा आहेत?

मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत वित्त आणि लेखा व्यवस्थापक या पदासाठी केवळ एक जागा भरण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही मोठी स्पर्धा असेल.

उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता निकष काय?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फायनान्स या पदासाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे पुढील पदवी असावी.

1.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया संस्थेतील CA/CMA ची व्यावसायिक पात्रता असलेली पदवी.

2. किंवा, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स ऑफ इंडिया संस्थेमधून CA/CMA ची व्यावसायिक पात्रता असलेली पदवी असणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमदवाराला वेतन किती मिळणार?

IIM Mumbai recruitment 2024 च्या जाहिरातीनुसार या पदासाठी पात्र निवड झालेल्या उमेदवारांला 67,700 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

वयाची अट

वरील पोस्ट साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षे असणे गरजेचे आहे.

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी सर्वात आधी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या https://iimmumbai.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.

पुढे फोटो, सही आणि पेमेंट केल्यावर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वित्त आणि लेखा व्यवस्थापक या पदासाठी अंतिम तारीख ४ मे २०२४ देण्यात आली आहे.

IIM Mumbai Recruitment 2024
School Jobs Scam : पश्चिम बंगाल सरकारला मोठा झटका; सीबीआयकडून शाळा भरती घोटाळ्याची चौकशी होणार, काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com