Sambhaji Bhide/Dilip Walase Patil Saam TV
मुंबई/पुणे

संभाजी भिडेंना क्लीनचीट मिळाली म्हणू नका; गृहमंत्र्यांचं वक्तव्य

'शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कोरेगाव-भिमा येथील दंगल प्रकरणी क्लीनचीट मिळाली असं म्हणायचे कारण नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना कोरेगाव भिमा येथील दंगल प्रकरणात क्लीनचीट मिळाली असं म्हणायचे कारण नाही. गुन्हा दाखल झालं तेव्हा FIR मध्ये त्यांच नाव होतं. चार्जशीट मधून पुरावे न मिळाल्यामुळे नाव वगळल असेल, तरीही आम्ही ते तपासून घेऊ असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) येथील दंगल प्रकरणातील सर्व गुन्ह्यातून संभाजी भिडे गुरुजी यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी आयोगाला दिली होती.

१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भिमा येथे दगडफेक आणि जाळपोळ झाली होती आणि या ठिकाणी झालेल्या दंगलीमध्ये भिडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न मिळाल्याने त्यांचं नाव दोषारोप पत्रातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र ,आता खुद्द गृहमंत्र्यांनीच भिमा कोरेगाव प्रकरणात भिडे यांना क्लीनचिट दिली आहे, असं म्हणता येणार नाही म्हंटल्याने आता या प्रकरणाला आणखी वेगळ वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"संभाजी भिडे यांना क्लीनचिट देण्यामागे जयंत पाटीलांचा हात"

तर संभाजी भिडे यांना क्लीनचिट देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा हात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले होते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील संभाजी भिडेंच्या पाया पडतात, त्यामुळे सूत्रं कुठून हालत असतील हे लक्षात घेतलं जावं. तसंच हा सगळा फ्रॉड आहे आणि त्याची कागदपत्रं माझ्याकडे असल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुफळी बाहेर येतेय असं मला वाटतं असं आंबेडकर म्हणाले होते. शिवाय ही सगळी साखळी आहे. सुप्रीम कोर्ट दोषी मानतं आणि तुम्ही त्यांना निर्दोष म्हणता. मात्र नाव वगळल्यानं हे प्रकरण मिटणार नाही. कोणत्याही गुन्ह्याला मायबाप असतो. हे सगळं समोर येईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

SCROLL FOR NEXT